सद्‌गुरु श्री वामनराव पै ह्यांचा अनुग्रह


सद्‌गुरु श्री वामनराव पै हे “शाब्देपरेचिनिष्णात” असे दुर्मिळ सद्‌गुरु आहेत. संसाराच्या सुखी कळीतून परमार्थ कसा फुलवायचा याचे सर्वांगीण मार्गदर्शन ते १९५२ सालापासून सतत निरपेक्षपणे करीत आहेत. त्यांनी दाखविलेल्या मार्गावरून मार्गक्रमण आणि साधना करीत आज अनेक जणांचा संसार चांग आणि परमार्थ सांग झाला आहे. हा अनुग्रह म्हणजे या वाटचालीची केवळ सुरुवात आहे